नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.
नियमांनुसार सर्व विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. सरकार देत असलेलं सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आश्वासन कधीच पूर्ण होत नसल्याचा मुद्दा संसदेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीत उपस्थित केला. तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांना संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी देण्याची मागणीही विरोधी पक्षांनी सरकारकडे केली.
तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली. या बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.