नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखसारख्या अती उंचावरील शीत प्रदेशात वापरायला योग्य अशा विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. हे डिझेल इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीनं विकसीत केलं आहे. लडाख, कारगील, काझा आणि केलाँग या भागातलं तापमान हिवाळ्यात उणे 30 डिग्री सेल्सिअस इतकं खाली जातं त्यामुळे इथल्या वाहन चालकांना डिझेल गोठण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं.
अमित शहा यांनी दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरसिंग सेवेद्वारे लडाखमधल्या नागरिकांशी संवाद साधला. केंद्रानं लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन बरीच वर्ष प्रलंबित असलेली लडाखच्या लोकांची मागणी पूर्ण केल्याचं शाह यांनी सांगितलं. लडाखमधल्या लोकांना या विशेष डिझेलचा पुरवठा संबंध हिवाळ्यात अखंडपणे केला जाईल, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.