मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी तसेच इतर भरती कार्यालयामार्फत 41 डाक सेवक/ सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पनवेल यांनी कळविले आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत http:// appost.in/gdsonline/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील पात्र उमेदवारांना अर्जाची फी प्रधान डाकघर, पनवेल यांच्याकडे जमा करता येणार आहे.
अफवांना, भूलथापांना बळी पडू नये
भारतीय डाक विभाग पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन व संदेश पाठवित नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सिस्टिम जनरेटेड संदेश त्यांची निवड झाल्यावर प्राप्त होऊ शकेल. आवश्यक पत्र व्यवहार अधिकृत भरती कार्यालयामार्फत केला जाईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी आपला नोंदणीकृत क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करु नये व अफवांपासून सावध राहावे. तसेच भारतीय डाक विभाग कोणत्याही हेतूसाठी आपणास फोन करत नाही. म्हणून उमेदवारांनी या बाबतीत जागरुक राहावे व कोणत्याही अफवांना, भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.