मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळा पूर्वी पद आणि गोपनियेतेची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवनात फडवणीस यांना शपथ दिली. उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावेळी शपथ घेतली.
गेले काही दिवस राज्यात सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या चर्चा बैठका सुरु होत्या. काल रात्री पर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर आजची घडामोड धक्कादायक मानली जात आहे.