नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत ‘डेफकॉम इंडिया 2019’ ही दोन दिवसीय परिषद सुरु झाली. तिन्ही सैन्यदलात उत्तम परस्पर संवाद सुविधा व्हावी यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘चिफ ऑफ डिफेंस स्टाफ’ हे पद निर्माण करण्या मागे हीच अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी देशापुढच्या सुरक्षाविषयक आव्हानांचा परामर्ष घेतला आणि सुसंवाद सुविधा उत्तम असण्यावर भर दिला. परिषदेच्या कालच्या पहिल्या दिवशी सैन्यदलं, उद्योगक्षेत्र, संशोधन आणि विकास संस्था तसंच शिक्षण संस्थां सहभागी झाल्या होत्या.