नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय दिव्यांग जन दिन आज पाळला जात आहे. समाजाच्या सर्व वर्गातल्या दिव्यांग व्यक्तींच्या अधिकार आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३ डिसेंबरला हा दिवस पाळण्यात येतो.

विकास कार्यक्रम २०३० मध्ये दिव्यांगजनांचा सहभाग आणि त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे ही यंदाची संकल्पना आहे. यानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.