मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या विशेष न्यायालयानं नीरव मोदीला आर्थिक घोट्ळयातला ‘फरार गुन्हेगार’ म्हणून घोषित केलं आहे. पंजाब नॅशनल बँकेतल्या आर्थिक घोटाळ्यातल्या या प्रमख आरोपीविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयानं त्याला फरार म्हणून जाहीर केलं.

फरार आर्थिक गुन्हेगार आधिनियमाअंतर्गत विजय माल्ल्यानंतर नीरव मोदी हा दुसरा उद्योगपती फरार म्हणून घोषित झाला आहे. गेल्या ऑगस्ट पासून हा अधिनियम लागू करण्यात आला. पीएनबी बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातले नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहूल चोक्सी प्रमुख आरोपी असून बनावट कागद सादर करुन कर्ज घेतलं होतं.

त्यामुळे पीएनबीचे दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सचं नुकसान झालं होतं. नीरव मोदीला लंडन इथं अटक करण्यात आली असून, त्याची भारताकडे प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.