नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत नियोजित वेळापत्रकानंतरही चर्चा सुरुच राहिल्यानं कोंडी कायम आहे. माद्रिद इथं सुरु असलेल्या या परिषदेच्या अध्यक्ष चिलीच्या पर्यावरण मंत्री कॅरोलिना श्मिट यांनी मसुदा कराराबाबत सर्व देशांनी संतुलित विचार करावा, असं आवाहन केलं आहे.
आपण हा करार अंमलात आणू शकतो हे बाह्य जगाला दाखवून देणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या. जगातले अतीश्रीमंत देश आणि गरीब देशही आपापल्या कारणांसाठी या मसुदा कराराला विरोध करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.