नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात बऱ्याच भागात दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक पट्ट्यांमध्ये दिवसा थंड ते अतिजास्त थंड हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

पश्चिम मध्य प्रदेश तसंच पूर्व राजस्थानमध्येही दिवसाचं हवामान थंड राहण्याचा अंदाज आहे. दिल्लीकरांनाही दुसऱ्या दिवशीही अतितीव्र थंडीच्या लाटेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. दरम्यान बिहारमध्ये पाटणा, गया, नवादा आणि रोहताश जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. तीव्र थंडीमुळे या ठिकाणच्या सर्व शाळांना पाच जानेवारीपर्यंत सुटी जाहीर केली आहे.