नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. राज्याचे सांस्कृतिक विकास मंत्री के. पांडिया राजन यांनी सरकारनं अगोदरच तत्वतः या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं सांगितलं.

त्रिची इथं काल एका सांस्कृतिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पांडियाराजन यांनी तामिळ भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक्रम शिकवणा-या देशातल्या तसंच परदेशातल्याही  सर्व सांस्कृतिक संस्थांचा गुणवत्ता निर्देशांक तयार करण्याची पावलं उचलण्यात येत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.