नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजीपार्क इथं होणा-या संचलनात मुंबई पोलिसांचं अश्वदल सहभागी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यावेळी मुंबई पोलिस दलातले ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई पोलीस दलात तब्बल 88 वर्षांनी पुन्हा अश्वदळाचा समावेश केला असून, अश्वदलाच्या संचलनाची पूर्वतयारी शिवाजी पार्क इथं सुरू झाली आहे. या अश्वदलात ३० घोडे, एक पोलिस उपनिरीक्षक, १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ४ पोलिस हवालदार आणि ३२ पोलिस शिपाई यांचा समावेश असेल, असं ते म्हणाले.
मुंबई पोलीस दल हे उत्कृष्ट पोलीस दल असून बदलत्या काळाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मुंबई पोलिसांनी केला आहे असं देशमुख यांनी सांगितलं. या दलासाठी राज्य शासनानं 30 अश्व, 1 पोलीस उप निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, 4 पोलीस हवालदार आणि 32 पोलीस शिपाई असे मनुष्यबळ मंजूर केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.