नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये भारताने मोठी भूमिका बजावावी असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केले आहे. भारताची लस उत्पादन क्षमता ही जगातील सर्वात जमेची बाजू असल्याचे गुटेरस यांनी म्हटले आहे. जागतिक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा भारताकडे उपलब्ध आहे असा विश्वास; गुटेरस यांनी व्यक्त केला आहे.

कोविड लसीच्या ५५ लाख मात्रा भारताने आपल्या शेजारच्या देशांना दिल्या असून ओमान, कॅरिबियन देश, निकारगुवा आणि प्रशांत क्षेत्रातील देशांना लस भेट म्हणून देण्याचीही भारताची योजना असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भारत आफ्रिकेला १ कोटी मात्रा आणि संयुक्त राष्ट्राच्या सर्व कर्मचार्यांना १० लाख मात्रा देण्याची योजना आखत असल्याचंही श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.