नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद येत्या १८ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरु होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर हे भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करतील.
परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते राजीव कुमार यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. परराष्ट्र धोरण आणि संरक्षण विषयक मुद्द्यांवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. या दोन अधिक दोन संवादाला गेल्यावर्षी डिसेंबरमधे सुरुवात झाली होती. या संवादामुळे भारत आणि अमेरिकेमधे धोरणात्मक रणनीती आखण्यास मदत होणार आहे, असंही कुमार यांनी सांगितलं.