नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक करण्यात आली आहे,अशी माहिती इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माईली यांनी दिली आहे.
याप्रकरणी जबाबदार असणा-यांना इराण कठोर शासन करेल, असं अध्यक्ष हसन रौहानी यांनी दूरचित्रवाणी संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. इराणच्या लष्करानं आपली चूक मान्य करुन सकारात्मक पाऊल उचललं असून भाविष्यात अशी चूक होणार नाही, असा विश्वास लोकांना दिला आहे, असंही ते म्हणाले.






