नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प अर्थात एसआरए राबवणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

या प्रकल्पाअंतर्गत झोपडपट्टीतील भाडेकरूंना घरमालक जाहीरकरून त्यांना घरे दिली जातील. अनेक जण इमारतीत राहायला जातात, मात्र झोपडी भाड्यानंदेतात. अशा परिस्थितीत भाडेकरूचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात गृहनिर्माण भवन उभारलं जाईल, या भवनात म्हाडा आणि एसआरएचीकार्यालयं असतील असंही आव्हाड यांनी सांगितलं. शिवाय झोपू योजनेतल्या  इमारतींचा दर्जा राखण्यासाठी गुणवत्ताकक्षाची निर्मिती करणार असल्याचंही आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केलं.