नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात  दोन दिवसीय परिषदेचं उद्धाटन गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली इथं करणार आहेत.

अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेमुळे बिमस्टेकच्या सर्व सदस्य राष्ट्रांना या गंभीर विषयावर आपली मतं मांडण्याची संधी मिळणार आहे.

आशियातल्या बहुतेक राष्ट्रांना अंमली पदार्थ तस्करीची झळ पोचत आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीचा धोका जागतिक असल्यामुळे या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

बिमस्टेक ही बंगालच्या उपसागरालगतच्या भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या सात देशांची संघटना आहे.