नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमद्ये येत्या एप्रिल महिन्यात होत असलेल्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषद २०२० साठीची पूर्वतयारी म्हणून, १७ फेब्रुवारीपासून देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये रोड शो चं आयोजन केलं जाणार आहे.

यानुसार फेब्रुवारी महिन्याच्या १७ तारकेला बंगळुरु आणि कोलकत्यात, २१ तारखेला मुंबईत, २ मार्चला हैदराबादेत, ५ मार्चला चेन्नईत आणि ९ मार्चला अहमदाबाद इथं रोड शो होतील. या रोड शोचं आयोजन आणि संभाव्य गुंतवणूकदारांशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारनं ५४ अधिकाऱ्यांनाही नियुक्त केलं आहे.

या गुंतवणूक शिखर परिषदेची तयारी म्हणून मार्च महिन्यात श्रीनगर आणि जम्मू इथं छोट्या स्वरुपातल्या परिषदांचंही आयोजन करण्यात आलं आहे.