पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश झाला आहे. त्यांनी रविवारी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी, मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.
बाळा भेगडे सलग दुस-यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पुणे जिल्हा भाजपचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात भाजपने चांगली कामगिरी केली आहे.
तळेगाव दाभाडे शहरात प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आमदार बाळा भेगडे यांना कोणते मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ :
कॅबिनेट मंत्री
1) राधाकृष्ण विखे पाटील
2) आशिष शेलार
3) संजय कुटे
4) सुरेश खाडे
5) डॉ. अनिल बोंडे
6) डॉ. अशोक उईके
7) जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
8) तानाजी सावंत (शिवसेना)
- राज्यमंत्री :
1) योगेश सागर
2)अतुल सावे
3) संजय उर्फ बाळा भेगडे
4) परिणय फुके
5) अविनाश महातेकर