नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या सूची हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याची अंमलबजावणी करायला आपल्या सरकारला कसलीही अडचण नाही, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
ते काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात बातमीदारांशी बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची या तीन वेगवेगळया बाबी आहेत, असं ते म्हणाले.
सुधारित नागरिकत्व कायद्यांअंतर्गत कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही, त्यामुळे अंमजबजाणीबाबत कुणालाही भिती बाळगण्याचं कारण नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.