नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी दुस-यांदा या पदावर निवडून आले आहेत. तिथल्या स्वतंत्र निवडणूक आयोगानं ही घोषणा केली, मात्र घनी यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय अमान्य करत स्वतःला विजयी घोषित केलं आहे.

आपण समावेशक सरकार स्थापन करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. अध्यक्षपदासाठी गेल्या २८ सप्टेंबरला निवडणुका झाल्या. त्यात घनी यांना ५० पूर्णांक ६४ शतांश टक्के मतं मिळाल्याचं निवडणूक आयोगानं काल जाहीर केलं. अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांना ३९ पूर्णांक ५२ शतांश टक्के मतं मिळाली आहेत. दरम्यान  तालिबाननंही घनी यांचा विजय अमान्य केला आहे.