नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं इराणमधे दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन नव्या रुग्णांना कोविड-१९ ची बाधा झाली असल्याचं आढळलं आहे. इराणच्या आरोग्यमंत्रालयानं याची पुष्टी करताना वृत्तसंस्थेला सांगितलं, की मरण पावलेले दोघेही इराणी नागरिक होते, आणि कोम शहराचे रहिवासी होते.
पश्चिम आशियात कोविड-१९ च्या बळीची पहिली नोंद या दोघांच्या मृत्युमुळे झाली. नव्यानं आढळलेल्या रुग्णांपैकी दोघेजण कोममधलेच असून, तिसरा रुग्ण अरबचा आहे.
कोम हे इस्लामच्या अभ्यासाचं तसंच पर्यटनाचं केंद्र असल्यानं इराण आणि इतर देशांमधल्या विद्वानांना कायम आकर्षित करत आलं आहे. मात्र, तिथं कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर इराकनं इराणमधे जाण्यासाठी आणि तिकडून येण्यासाठीच्या प्रवासावर बंदी घातली आहेत.
कुवेतनंही इराणला जाणा-या सर्व विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत.