नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भुवनेश्वरमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये राज्यातल्या खेळाडूंची आगेकूच सुरुच आहे. पदक तालिकेमध्ये पुणे विद्यापीठाने अव्वल क्रम कायम ठेवला असून मुंबई विद्यापीठ ५ व्या, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ दहाव्या आणि औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठ १२ व्या स्थानी आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ज्योति आणि आरती पाटील यांनी १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले. १०० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या रुंद्राश मिश्राने सुवर्ण पदक पटकावले. तर सिद्धांत सेजवळला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

१०० मीटर आणि २०० मीटर फ्री स्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत पुणे विद्यापीठाची सविता धुरी हिने सुवर्ण तर नागपूर विद्यापीठाच्या रुतुजा तळेगावकरनं कांस्य पदक पटकावलं.