नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी “महावितरणला” दिले आहेत. ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
मीटर रिडींग करण्यासाठी तसंच देयकाचं वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी, आजपासून पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये, असे निर्देश राऊत यांनी दिले आहेत.
या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी देयक पाठवण्याची सूचना देण्यात आली आहे. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या संकेतस्थळावर देयकं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर देयकाबाबतचा एसएमएस पाठवण्यात येईल अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.
या कालावधीत थकबाकीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करण्याचे आदेशही देण्यात आला आहे.