नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होत्या.

खासदार राहुल गांधी यावेळी उपस्थित होते. सर्व राज्य शासनांनी या अनुषंगानं वयोवृद्ध, फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असलेले लोक, मधुमेही आणि हृदयरुग्णांसाठी विशेष सूचना प्रसिद्ध कराव्यात, आणि त्यांची अधिक काळजी घ्यावी, असं राहुल गांधी म्हणाले.