नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे स्थित ‘मातोश्री’या खाजगी निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची कोरोना विषाणूसंबंधी चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
या निवासस्थानानजिकच्या एका चहा विक्रेत्याला या विषाणूची लागण झाल्याचं काल स्पष्ट झाल्यामुळं या चाचण्या केल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.