नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ पाच मिनिटे उभे राहण्यासाठी समाज माध्यमावर फिरत असलेल्या बातम्यांवर प्रधानमंत्र्यांनी भाष्य केले आहे. प्रथमदर्शनी मला विवादात ओढण्याचा हा प्रयत्न असल्याचे मला वाटले.

पण असे अभियान चालवणाऱ्यांना माझ्याबद्दल खरंच प्रेम आणि आदर वाटत असेल तर त्यांनी कोरोना संकटादरम्यान किमान एका गरीब कुटुंबाचा खर्च उचलावा, यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी होऊ शकत नाही असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटर वर म्हटलं आहे.