नवी दिल्ली : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णांना विलग करण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे आता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर केला जाणार आहे.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या साडेचार हजारांपर्यंत पोहोचली आहे. प्रभादेवी, वरळीचा समावेश असलेल्या जी दक्षिण विभागातच ५३४ कोरोनाबाधित आहेत. त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना किंवा संसर्ग झालेल्यांना क्वारंटाईन करायचं कुठं, असा प्रश्न पालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

होम क्वारंटाईन करायचं तर रूम लहान असून तिथं दाटीवाटीनं माणसे राहत आहेत. म्हणून शाळेतच विलगीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे.