नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करणार असून, काही जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार आहे. गृह मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या स्थितीसंदर्भात व्यापक आढावा बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
याबाबत सविस्तर सूचना येत्या एक दोन दिवसात जारी केल्या जाणार आहेत. टाळेबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. तीन मे पर्यंत सर्वत्र टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जावी, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.