नवी दिल्ली : लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केल्यानंतर आज नाशिकहून दोन गाड्या रवाना झाल्या. ३३२ कामगारांना घेऊन एक गाडी मध्य प्रदेशात भोपाळला गेली.

दुसरी गाडी ८४९ कामगारांना घेऊन उत्तर प्रदेशात लखनौ इथं रवाना झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला.

राजस्थानात कोटा इथं अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन राज्य परिवहन मंडळाच्या ७४ बसगाड्या काल रात्री पुण्याला परतल्या. स्वारगेट बसस्थानकावर आलेल्या सर्वांची प्राथमिक तपासणी झाली असून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.