नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या महामारीविरुद्धच्या लढ्यासाठी एकतीसशे कोटी रुपयांची तरतूद पीएम केअर्स फंडानं केली आहे.
यातले २ हजार कोटी रुपये व्हेंटीलेटरच्या खरेदीसाठी, एक हजार कोटी रुपये स्थलांतरित कामगारांच्या देखभालीकरता तर एक हजार कोटी रुपये कोरोनाची लस विकसित करण्याकरता वापरले जाणार आहेत.
गेल्या २७ मार्चला प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या निधीची स्थापना झाली.