नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकी देणारा संदेश पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आज चुनाभट्टी इथल्या एका रहिवाशाला अटक केली. उत्तरप्रदेश पोलिस दलाच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कला गेल्या शुक्रवारी हा संदेश मिळाला.

त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना याबाबत सतर्क केलं. हा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध  पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल.