पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे नॉलेज क्लस्टर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा घेतला. अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या आणि पुढील कालावधीत आवश्यकता भासल्यास करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबतची माहिती पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी पुणे विद्यापीठाने बनविलेल्या व्हेंटिलेटरचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
या बैठकीस पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितिन करमळकर, उपायुक्त प्रताप जाधव, प्रा.एन.एस. उमराणी, प्रोफेसर शशिधरा, खगोल शास्त्रज्ञ सोमक रायचौधरी, समिर धुरडे, डॉ.कांबळे, डॉ.भालचंद्र पुजारी, डॉ.स्नेहल शेकटकर, डॉ. अश्विनी केसकर हे उपस्थित होते.