नवी दिल्ली : राज्य सरकारचा विरोध असला तरी इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेणार असल्याचं आय सी एस ई अर्थात भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र शिक्षण मंडळानं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं आहे.
येत्या २ जुलै ते १२ जुलै दरम्यान राज्यभरात ही परीक्षा घ्यायच्या आय सी एस ई मंडळाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्त आणि न्यायमूर्ती एस एस शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.
परीक्षा घेण्यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचा दावा मंडळान केला असून कोविडग्रस्त अथवा कंटेनमेंट क्षेत्रात राहणारे विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात पुनर्परीक्षा देऊ शकतात असं मंडळानं सांगितलं आहे. राज्यात आय सी एस ई शिक्षण मंडळाअंतर्गत २२६ शाळा येत असून २३ हजार ३४७ विद्यार्थी शालांत परीक्षा देणार आहेत.