नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिडे ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत आणि रशिया यांना यंदाचे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारे भारतीय खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख इंटरनेट सुविधा खंडित झाल्यामुळे आपली खेळी वेळेत पूर्ण करू शकले नाहीत.
त्यानंतर रशियाच्या संघाला विजेते म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्याला भारतानं आव्हान दिल्यानंतर फिडेच्या अध्यक्षांनी दोन्ही देशांच्या संघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला.
सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या संघाचे अभिनंदन केलं आहे.