मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)च्या 28 टीम कार्यरत आहेत अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

एनडीआरएफ पथक संख्या

एनडीआरएफच्या १८  टीम्स राज्यात कार्यरत असून ओडिशावरुन ५ एनडीआरएफ टीम्स आल्या आहेत.तसेच 5 टीम भटिंडावरुन  वरून आल्या आहेत.

सांगली – ११, कोल्हापूर – ६, मुंबई- ३, नाशिक – १, पुणे – १, पालघर – १, ठाणे – १, रायगड – १, सिंधुदुर्ग – १, सातारा – १,नागपूर – १ अशा 28 टीम कार्यरत असून या शिवाय एसडीआरएफची धुळ्याची टीम 1 कोल्हापूर ला आणि 2 टीम सांगलीला  पाठविण्यात आल्या आहेत.

कोस्ट गार्डच्या 2 टीम 4 बोटी व एनडीआरएफच्या 1 बोटीसह मुंबईवरून कोल्हापूरसाठी निघाल्या आहेत. तसेच एनडीआरएफची अतिरिक्त 5 टीमची मागणी केली असून त्या अनुषंगाने तातडीची मदत म्हणून 3 टीम पाठविण्यात आल्या आहेत.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक अभय यावलकर सतत माहिती घेत असून जिल्ह्यातील आपत्ती निवारणासाठी राज्यातून मागणी आहे त्यानुसार टीमची नियुक्ती करण्यात येत असून पूरपरिस्थितीबाबतचा सतत आढावा घेण्यात येत आहे.