मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानपरिषदेच्या २ शिक्षक आणि ३ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करुन  ही निव़डणूक होत आहे. पदवीधर मतदारसंघात पुणे विभागात दुपारी बारा वाजेपर्यंत 19 पूर्णांक 44 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर पुणे विभागात शिक्षक मतदार संघात 26 पूर्णांक 25 टक्के मतदान झालं आहे.

सोलापूर जिल्ह्यात पुणे पदवीधर मतदारसंघात 20 पूर्णांक 72 टक्के तर शिक्षक  मतदारसंघात 35 पूर्णांक 36टक्के  मतदान झालं. नागपूर पदवीधर मतदारसंघात दुपारी बारा पर्यंत 19 पूर्णांक 70 टक्के मतदान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ ,संजीव कुमार यानी दिली. या निवडणुकीसाठी नागपूर विभागात 2 लाख 6 हजार 454 मतदार असून नव मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

बुलडाणा जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी दुपारी 12 पर्यंत 24 पूर्णांक 80 टक्के मतदान झालं. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दुपारी बारा वाजेपर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात 20 पूर्णांक 64 टक्के मतदारांनाी मतदानाचा हक्क बजावला. तर नांदेड जिल्ह्यात 20 पूर्णांक 48 टक्के मतदान झालं आहे. परभणीत दुपारी बारा वाजेपर्यंत 24  पूर्णांक 23 टक्के मतदान  झालं आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिममधल्या 77 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. अमरावती विभागात दुपारी 12 पर्यंत  25 पूर्णांक 11 टक्के मतदान  झालं आहे. विधानपरिषदेच्या धुळे, नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघातही आज मतदान सुरु आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्ही जिल्ह्यातल्या 10 मतदान केंद्रावर मिळून 69  पूर्णांक 11 टक्के मतदान  झालं आहे.