नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज ऑगस्ट क्रांती दिन. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ऑगस्ट क्रांती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी भारत छोडो अभियातान सहभागी झालेल्यांचं पुढच्या पीढीनं नेहमी स्मरण करावं, अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारत छोडो या गांधीजींच्या नाऱ्यानंतर संपूर्ण देशातली युवापीढीनं या आंदोलनात स्वत:ला झोकून दिलं. त्या सगळ्यांचा देश सदैव ऋणी राहील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. देशवासीयांना दिलेल्या देशातला सामान्य माणूसही देशहितासाठी त्याग करु शकतो. प्राणांचं बलिदान देऊ शकतो. नेतृत्वं करु शकतो, हे नऊ ऑगस्टच्या या ऐतिहासिक क्रांतीदिनानं सिद्ध केलं आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य चिरंतन ठेवण्याचा पुनर्निर्धार करुया अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांना क्रांतिदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.