नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या असंघटित कामगारांसाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं ई श्रम  पोर्टल सुरु केलं आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत या पोर्टलचं लोकार्पण झालं. या पोर्टलद्वारे देशातल्या असंघटित श्रमिकांची नोंदणी करता येईल तसंच त्यांची माहिती एकत्रित केली जाईल, ज्यायोगे केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणं शक्य होईल. देशातल्या सर्व कामगार संघटनांनी या पोर्टलचं  स्वागत केलं असून हे कार्य पूर्णत्वाला यावं याकरता पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.