मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथल्या भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. ही यात्रा दरवर्षी दोन दिवस चालते. आज पहाटे तीन वाजल्यानंतर भाविकांना देवीचे दर्शन देण्यास सुरुवात झाली. भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी नऊ रांगांची व्यवस्था तसंच दिव्यांगांसाठी विशेष दर्शन रांग आणि महनीय व्यक्तींसाठी विशेष स्वतंत्र रांग अशा एकूण अकरा रांगांची व्यवस्था आंगणेवाडी मंडळाने केली आहे. जिल्हा प्रशासनाने भाविकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. मंदिर परिसरात स्वयंसेवक ,पोलीस प्रशासन तसेच आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत.