नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका या तिघांना पुरवण्यात आलेली विशेष सुरक्षा गटाची संरक्षण सुविधा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

सुरक्षा सुविधांचा विस्तृत आढावा घेतल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला, अशी माहिती नवी दिल्लीत एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. यापुढे या तिघांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची झेड-प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येईल, गांधी कुटुंब देशात कुठेही प्रवास करत असेल, तेव्हा ती सुरक्षा कायम असेल, तसंच त्यांच्या निवास स्थानी सुरक्षा रक्षक तैनात असतील, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.