मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशांप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी वेळोवेळी जिल्हा मुख्यालय आणि तालुका मुख्यालय केरोसीन मुक्त करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कुडाळ शहर येत्या १ डिसेंबर पासून कुडाळ शहर केरोसीन मुक्त करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने शहरातल्या किरकोळ केरोसीन परवानाधारकांना वितरीत केला जाणारा केरोसीन पुरवठा बंद करण्यात येणार आहे. कुडाळ नगरपंचायत हद्दीतल्या किरकोळ केरोसीन दुकानाला जोडण्यात आलेल्या केरोसीन पात्र लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीशी तात्काळ संपर्क करून गॅस जोडणी घ्यावी, असं आवाहन तहसीलदारांनी केलं आहे.