नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालकांनी आपल्या मुलांशी मित्र होऊन संवाद साधावा, असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे. त्या मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होत्या.

मुलं बघत असलेल्या दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमाचा दर्जा तसंच वेळ हे पालकांनीच ठरवलं पाहिजे आणि मुलांना महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा पालकांनी आपला वेळ द्यावा, असं आवाहन स्मृती इराणी यांनी केलं. या कार्यक्रमा आधी त्यांनी नवी दिल्लीमधे दुसऱ्या दक्षिण आशियाई सुरक्षा परिषदेला संबोधित केलं.

त्यावेळी घरामधे महिला आणि मुलांना सुरक्षित वातावरण मिळण्यावर तसंच अत्यचार आणि दुर्वर्तनापासून त्यांचं रक्षण करण्यावर त्यांनी भर दिला होता.