नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे.
मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी गेल्या शनिवारीच १ लाख टन कांदा आयात करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार एमएमटीसीनं ४ हजार टन काद्यांच्या खरेदीसाठी याआधीच निविदा मागवल्या आहेत.