नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षातली ही पहिली दरवाढ असून, रविवारी याबाबतची घोषणा करण्यात आली होती.

सेवा पुरवठादारांच्या उत्पन्नातून वाटा मिळण्यासंदर्भातली महसूल गणनेची सरकारची पद्धत ग्राह्य ठरवणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं 24 ऑक्टोबरला दिला होता. त्यानुसार ही दरवाढ करण्यात आली.