नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे.

अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं केलेल्या एका अभ्यासात पापूआ आणि इंडोनेशियामधले हिमनग सगळ्यात आधी वितळतील, असंही म्हटलं आहे.

या हिमनगांच्या भोवतालची हवा ही उष्ण झाल्यामुळे हे वितळतील असंही या अभ्यासात म्हटले आहे.