नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट इथं काल झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता.

भारतानं विजयासाठी ठेवलेल्या ३४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकं आणि एका चेंडूत ३०४ धावांत आटोपला. भारताच्या के. एल राहुलला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.