नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध घातल्यानं कायद्यातल्या कोणत्याही तरतूदींचं उल्लंघन होत नसल्याचं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल राज्यसभेत सांगितलं.

काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी म्हटलं होतं की, अनेक संसद सदस्य 65 वर्षांवरील वयाचे असल्यानं त्यांना अधिसूचनेचं पालन करावं लागेल. मात्र, अत्यावश्यक सेवेत असणारे या अधिसूचनेत वगळले जाणर असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.