मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ६२० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख एक हजार सातशे रुग्ण, कोरोनामुक्त झाले. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५१ शतांश टक्के इतका झाला आहे.

काल ३ हजार ९१३ नवीन कोविडबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ६ हजार ३७१ झाली आहे.सध्या राज्यात ५४ हजार ५७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ९३ रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे ४८ हजार ९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यू दर २ पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे.

रायगड जिल्हय़ात आतापर्यंत ५७ हजार ४०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल बाधित रूग्णाची संख्या  ४८ ने वाढली असून जिल्ह्यातील एकूण रूग्णाची संख्या आता ५९ हजार ७०४ इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यात  ६६७ रुग्ण उपचार घेत आहेत.आतापर्यंत १ हजार ६३२ रूग्णांना कोरोना मुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

नाशिक- जिल्ह्यात काल ३३९ रूग्ण बरे झाले. तर ३३० नवे बाधीत आढळले आहे. सध्या जिल्ह्यात ५९६ रूग्ण उपचार घेत आहेत.

परभणी जिल्ह्यात काल एक, तर आतापर्यंत ७ हजार ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल १६ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या ७ हजार ५१२ झाली आहे. सध्या १३४ रुग्ण रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्ह्यात काल १७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार ४०० रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल १०३ नवीन रुग्ण आढळल्यामुळे, एकूण रुग्ण संख्या ५४ हजार २६७ झाली आहे. सध्या १ हजार ७३ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ७९४ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल ३, तर आतापर्यंत ३ हजार ३८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ७ नवीन रुग्ण आढळल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून ३ हजार ४७१ झाली आहे. सध्या ३० रुग्ण उपचाराधीन आहेत.

जालना जिल्ह्यात काल ४४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ३६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल बारा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ९७४ झाली आहे. सध्या २६४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३४१ रुग्णांचा बळी गेला आहे.

नागपुर जिल्हयात काल २६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १२ हजार ९७१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल ३६५ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या एक लाख १२ हजार ९९३ झाली आहे. जिल्ह्यात या आजारामुळे ३ हजार ८७१ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल ११, तर आतापर्यंत ६ हजार १६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल १८ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे, रुग्णांचा आकडा ६ हजार ५६३ वर गेला आहे. सध्या २४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४८ रुग्ण दगावले आहेत.

बुलडाणा जिल्हयात काल ५२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ११ हजार ७७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ३९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, रुग्णांची एकूण संख्या १२ हजार २६६ वर गेली आहे. सध्या ३६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात काल ३६, तर आतापर्यंत २० हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३३ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे, रुग्णांचा आकडा २१ हजार १८२ वर पोचला आहे. सध्या ३०८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५६६ रुग्णांचा बळी गेला आहे.