जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालापास यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालापास यांनी आज नवी दिल्ल्लीत प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मालापास चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. नीती आयोगाच्या वतीनं नवी दिल्लीत...

मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले चित्रकलेचे ब्रश पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले १३ हजार २०६ चित्रकलेचे ब्रश ठाण्यात मीरारोड इथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर...

औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर या काळात जागतिक धम्म परिषद

मुंबई : औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर याकाळात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषद होणार आहे. या परिषदेला श्रीलंका, नेपाळ, कंबोडीया, जपान, व्हिएतनाम, म्यांमा, थायलंडसह १३...

काँग्रेसनं केली तीन नगरसेवकांची हकालपट्टी

मुंबई : विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, नंदुरबारमधल्या नवापुर नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची काँग्रेस पक्षानं हकालपट्टी केली. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही कारवाई केली...

३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस

नवी दिल्ली : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी देशभरात लाखो...

नव्या मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी राज्याच्या मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घ्यावी – छत्रपती संभाजीराजे

मुंबई : नव्या  मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी राज्याच्या मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घ्यावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घेऊन आमदारांनी विकासकामं करावी,...

सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही – काँग्रेस नेते विजय...

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता ही लोकहितासाठी राबवायला हवी. मात्र जर का सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालं असं...

राज्याच्या विधानसभेत यंदा २४ महिला आमदार

मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोननं अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची...

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. केवळ दहा जागा वाढलेल्या पक्षाचं प्रसारमाध्यमं...

पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त

पिंपरी : पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. चारही मतदारसंघात दुरंगी लढत झाल्याने उर्वरित उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला असून...